आयकर कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

पुणे : आयकर कर्मचारी संघटनेचेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी आयकर विभागाचे कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. गेल्या ३ मार्च पासून सुरू झालेल्या आंदोलनमध्ये कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद सहभागी झाले आहेत. नवीन पेन्शन योजना, नवनियुक्ती, इंटरचार्ज ट्रान्स्फर, केडर रिह्यू प्रपोजल आदी मागण्यासाठी सर्व कर्मचारी झगडत आहेत, अशी माहिती आयकर विभाग कर्मचारी संघटनेचे पश्चिम विभागीय सचिव शरद मुऱ्हे यांनी दिली.

याविषयी बोलताना शरद मुऱ्हे म्हणाले की, आयकर विभाग कर्मचारी संघटना ही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देत असते. वेळोवेळी सरकार बरोबर संवाद साधून देखील सरकारच्या वतीने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे सर्व कर्मचारी सकाळपासून मध्यानापर्यंत (दुपारी ११ ते २) आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोचविण्यासाठी हे आंदोलन करत आहेत.

ते पुढे म्हणाले की, मागण्या मान्य होईपर्यंत कर्मचारी सरकारच्या वतीने आखण्यात येणाऱ्या कोणत्याही छाप्यामध्ये किंवा धाडीमध्ये सहभागी होणार नाहीत. याबरोबरच टीडीएस स्पॉट सर्व्हेमध्ये देखील कोणताही कर्मचारी सहभागी होणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: