Saturday, May 30, 2026
PUNETOP NEWS

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती ‘देऊळ बंद’ धार्मिक विधी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांची मोठी गर्दी होऊ नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अंगारकी चतुर्थीला बंद ठेवण्यात आले होते. भाविकांनी रस्त्यावरुनच गणरायाचे दर्शन घेतले. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये दिवसभर ब्रह्मणस्पती सूक्त, गणेशयाग, सहस्त्रावर्तन, लक्षार्चना हे धार्मिक विधी करण्यात आले. 
अशोक गोडसे म्हणाले, अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात आले. अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी. 
घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने वेळोवेळी केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे  www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय आहे. भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading