Tuesday, June 16, 2026
PUNE

मुठा नदीकाठी फुलणार देवराई

पुणे : देवराई, जंगले नष्ट होत असल्यामुळे आता केवळ १५ टक्के देवराई अस्तित्वात आहेत. त्यामुळे  प्राणी, किडे, मुंग्या, मधमाश्या यांचा अधिवास नष्ट होत आहे. वृक्षारोपण करताना फक्त झाडे न लावता त्याठिकाणी किटक, माश्या आणि पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला पाहिजे, या भावनेतून लकडी पूल विट्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब पूना सिटीच्या वतीने लकडी पूल विट्ठल मंदिराच्या परिसरात देवराईची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, लायन्स क्लब पूना सिटीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, रघुनाथ ढोले, शंकर महाराज मठाचे अध्यक्ष भगवान खेडेकर तसेच राजा बलकवडे, डॉ. मदन कोठुळे, आळंदी देवस्थानचे चोपदार, रामभाऊ रणदिवे, ट्रस्टचे नरेंद्र गाजरे,बाळासाहेब ताठे, महेश अंबिके,रमेश मणियार उपस्थित होते. 

विविध प्रकारची १०० देशी झाडे यावेळी लावण्यात आली. यामध्ये काटेसावर, लुजपांगारा, पळस, बकुळ, ताम्हण, पिंपळ, पिंप्रन, उंबर, जांभूळ जास्वंद मोगरा आदींचा समावेश आहे. 
दिपक थोरात म्हणाले, देवराई उपक्रमांतर्गत मंदिराच्या मागे ८० देशी रोपे आणि २० फुलझाडे लावली आहेत. यामुळे पक्षी, किडे, मुंग्या यांच्यासाठी नदीकाठच्या जागेत एक चांगली देवराई निर्माण होईल. तसेच मंदिरातील निर्माल्याचा वापर खत म्हणून होईल. 
रायरघुनाथ ढोले म्हणाले, निसर्गाकडून जे घेतले आहे, ते परत केले पाहिजे. यासाठी निसर्गाचा अभ्यास करा. जिथे शक्य आहे तिथे देवराई निर्माण करा. देवराई निर्माण करण्यासाठी पैसे नाही तर श्रम लागतात. झाडे ही शाश्वत श्रीमंती आहे. ही संपत्ती वाढवायची असेल एक झाड तोडण्याआधी विचार करायला पाहिजे, आणि त्याच्या तिप्पट झाडे लावायला हवीत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading