स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकॅथॉनसाठी नोंदणी सुरु

पुणे : स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकॅथॉन या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, नवउद्योजक यांची नोंदणी सुरु झाली आहे. हा कार्यक्रम भारतातील स्वीडन दूतावास, मुंबईतील स्वीडनचे वाणिज्य दूतावास व स्वीडिश इन्सिट्यूटच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

हा हॅकथॉन ४२ तास चालेल. या हॅकॅथॉनचे उद्दीष्ट दळणवळण क्षेत्रातील भविष्यातील कल्पनांची रचना, चाचणी आणि अंमलबजावणी हे आहे. मुंबईमधील स्वीडनच्या वाणिज्य दूतावासाच्या कॉन्सुल जनरल श्रीमती ॲना लेक्वाल यावेळी म्हणाल्या की, सुजानशीलता हे नेहमीच भारत आणि स्वीडन यांचा संबंधामधील महत्वाचा दुवा ठरला आहे. स्वीडन-इंडिया मोबिलिटी हॅकॅथॉन या भागीदारीला विस्तार करीत, विद्यार्थी, स्टार्ट-अपकंपन्या आणि दोन्ही देशांतील तज्ञांना दळणवळण क्षेत्राकरीता नवीन उपाययोजना निर्माण करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.

इच्छुक या हॅकॅथॉनसाठी विनामूल्य २५ फेब्रुवारी २०२१पर्यंत नोंदणी करू शकतात, पुढील वेबसाईटवर https://hack.sweden.se/mobility-hack

Leave a Reply

%d bloggers like this: