Sunday, June 14, 2026
Business

सर्वांचे हित जपण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव

पुणे, दि. १२ –  : ग्राहक आणि उद्योजक या दोघांना एकाच व्यासपीठावर व्यवसाय आणि खरेदीच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र निश्चितच दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आर्थिक विकास साधताना सर्वांचे हित जपण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच कटिबद्ध आहे, असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापिक संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी व्यक्त केला.

पुणे शहर, पूर्व व पश्चिम विभाग यांच्या वतीने ‘मेगा रिटेल लोन एक्स्पो’चे आयोजन चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय मैदानात करण्यात आले होते. या एक्स्पोचे उदघाटन ए. एस. राजीव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, पुणे शहर प्रबंधक व्ही. पी श्रीवास्तव, पुणे पूर्व क्षेत्रीय प्रबंधक वीणा राव, पुणे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास आदी मान्यवर उपस्थित होते.

या एक्स्पोमध्ये बांधकाम, ऑटोमोबाईल, सोनेतारण, शिक्षण व विमा क्षेत्रातील सुमारे २५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप तसेच सुमारे ५० कोटी रुपयांचे नवीन कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यात आले. कर्ज मंजूर झालेल्या ग्राहकांना ए. एस. राजीव यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवांगी राय तर आभार पुणे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading