Saturday, June 13, 2026
MAHARASHTRATOP NEWS

आपल्याला फारवेळ विरोधी पक्षात राहायचे नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही लोकांच्या इगोमुळे पुढची चार वर्षे मेट्रो सेवा सुरु होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading