Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRAPUNE

स्वरभास्कराला ‘अभिवादन’

पुणे, दि. २७ – भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी येत्या ४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ व ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सांगीतिक मैफालींबरोबर भीमसेनजींच्या आठवणींना उजाळादेखील देण्यात येणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्निवास जोशी यांनी दिली.

कार्यक्रम तीन सत्रात होणार असून शनिवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यानंतर सांगीतिक कार्यक्रमाला प्रारंभ होईल. दुसरे सत्र दि. ७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १२ या वेळात रंगणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या सत्रात संगीत क्षेत्राबाहेरील क्षेत्रातील प्रथितयश मान्यवर पंडितजींविषयी आठवणींनाउजाळा देणार आहेत. यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, तंत्रज्ञ व प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखक, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले संवाद साधणार आहेत.

पंडितजींच्या देहावसानानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे त्यांच्यावर एका विशेष लघुपटाचीनिर्मिती करण्यात आली होती. हा लघुपट तिसऱ्या सत्रात (दि. ७ फेब्रुवारी) दाखविण्यात येणारआहे. प्रत्येक सत्रातील गायन-वादनाच्या कार्यक्रमांमध्ये, ज्येष्ठ गायक पं. अजॉय चक्रवर्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतार वादक उस्ताद शाहीद परवेज, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, पंडितजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी तसेच पंडितजींचा नातू विराज जोशी आदी कलाकार रसिकांपुढे आपली कला सादर करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading