Saturday, June 13, 2026
PUNE

डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज ‘ पॅनल बहुमताने विजयी

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी निवडणूक

पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज ‘ पॅनल चे सर्वच्या सर्व 13 उमेदवार ७६ टक्के मतदान घेऊन प्रचंड बहुमताने निवडून आले.

रविवार दि. २४ जानेवारी रोजी ही निवडणूक झाली. एकूण ३ हजार मतदारांपैकी ४५ टक्के मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला. १३ पदांसाठी ही निवडणूक झाली. ‘अवामी महाज ‘ पॅनलच्या १३ उमेदवारांना ७६ टक्के मते मिळाली. चुरशीच्या वातावरणात झालेल्या निवडणूकीचा रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला. विरोधी १३ उमेदवारांना २४ टक्के मते मिळाली. यशस्वी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

‘एम.सी.ई. सोसायटीच्या सर्व सभासदांनी आमच्या पॅनलच्या नेतृत्वावर पुनश्च विश्वास दाखवला व मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचा मी आभारी आहे . ‘नाही रे’ वर्गापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत होतो आणि त्याच ध्यासाने यापुढेही कार्यरत राहू’ अशी प्रतिक्रिया डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली. अॅड. जे एफ शेरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

पुणे कॅम्प परिसरात असलेल्या या संस्थेत ३२ शैक्षणिक आस्थापना असून २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील १४ हजार विद्यार्थी गरीब आणि झोपडपट्टीत राहणारे आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading