सोपी, अ‍ॅप-आधारित वैद्यकीय सल्लासेवा देण्याकरीता ‘वी’ची ‘एमफाईन’सोबत भागीदारी

मुंबई – सामाजिक अंतर राखण्याच्या या काळात, रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन उपचार घेण्याची वेळ आल्यास आरोग्यविषयक जोखीम निर्माण होण्याची शक्यता असते; तथापि तंत्रज्ञानामुळे ही जोखीम टाळता येते. या दृष्टीने, ग्राहकांना एक वेगळे व सर्वांगीण डिजिटल सोल्युशन देण्याकरीता,  भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, ‘वी’, हिने ‘एमफाईन’बरोबर एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. ‘एमफाईन’ हा भारतातील पहिला ‘एआय-पॉवर्ड’ हेल्थकेअर प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विश्वासार्ह रुग्णालयांच्या साखळीतील डॉक्टरांशी रुग्णांना ‘इन्स्टंट चॅट’द्वारे संपर्क साधता येतो व ‘व्हिडिओ कन्सल्टेशन’द्वारे सल्ला घेता येतो.

‘एमफाईन’चे अॅप वापरून ‘वी’च्या ग्राहकांना नामांकित व विश्वासार्ह रुग्णालयांमधील आपल्याला हवे ते डॉक्टर निवडता येतात. या डॉक्टरांशी रुग्णांना थेटपणे चॅट करता येते किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन करून प्रिस्क्रीप्शन व उपचार घेता येतात. ‘एमफाईन अॅप’वर रुग्णांना छायाचित्रे, मागील वैद्यकीय नोंदी व जुनी प्रिस्क्रीप्शन्स अपलोड करता येतात. देशभरातील 600हून अधिक नामांकीत रुग्णालयांमधील चार हजारांहून अधिक डॉक्टर ‘एमफाईन’च्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. सुमारे 35 स्पेशालिटीजमधील या तज्ज्ञांमध्ये देशातील अव्वल श्रेणीतील डॉक्टरांचाही समावेश आहे.

‘वी’चे मुख्य विपणन अधिकारी अवनीश खोसला म्हणाले, “एमफाइन’बरोबरची आमची भागीदारी, ही ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण व संपूर्ण डिजिटल स्वरुपाचे सोल्युशन देण्याच्या आमच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. शिकणे, कौशल्य वाढविणे, तसेच आरोग्य व स्वास्थ्य यांच्या संदर्भात अनोखे प्रस्ताव देत, उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरीता ग्राहकांना सज्ज करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. ‘एमफाईन’बरोबरची ही भागीदारी आजच्या डिजिटल समाजाच्या बदलत्या गरजा भागवते. त्यातून ग्राहकांना अनेक प्रकारचे मूल्यवर्धित लाभ मिळतील. या भागीदारीमुऴे ‘वी’च्या ग्राहकांना देशभरातील 600 भागीदार रुग्णालये, 30 स्पेशालिटीजमधील 4 हजार डॉक्टर यांची अत्युत्कृष्ट आरोग्यसेवा घरबसल्या मिळेल. विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी करणे व डिजिटल उत्पन्नाचे स्रोत तयार करणे हा ‘व्हीआयएल’च्या व्यावसायिक धोरणाचा एक भाग आहे. ‘एमफाईन’शी केलेली भागीदारी ही अशाच स्वरुपाची असून त्यातून आमच्या ग्राहकांसाठी अधिक मूल्ये निर्माण होतील व व्यवसायात वाढीच्या संधी उपलब्ध होतील, असा आमचा ठाम विश्वास आहे.”

या भागीदारीबद्दल बोलताना ‘एमफाईन’चे मुख्य व्यवसाय अधिकारी व संस्थापक सदस्य अर्जुन चौधरी म्हणाले, “कोविड-19 नंतरच्या जगात आरोग्यसेवा पुरविण्याच्या नवीन परिस्थितीत, सामाजिक अंतर राखण्यासाठी आणि आरोग्यसेवेची जास्तीत जास्त संसाधने उपलब्ध होण्यासाठी, टेलीमेडिसीन या पद्धतीचा सतत वापर आवश्यक असणार आहे. आम्ही ‘वी’सह भागीदारी करण्यास आणि प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्यास खूप उत्सुक आहोत. अंतर राखण्याची गरज व वेळ यांचे निर्बंध दूर करीत आणि मोबाइल तंत्रज्ञानाची शक्ती वापरीत, एमफाईन आपल्या वापरकर्त्यांना देशभरातील डॉक्टर आणि तज्ज्ञांशी संपर्क साधण्यास मदत करत आहे. यापूर्वी टेलिमेडिसीन कधीही न वापरलेले रुग्ण आता भारतभरातील तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे गेल्या 6 महिन्यांतील आमचे निरीक्षण आहे. मोबाइलच्या सामर्थ्याने देशातील 1 हजारहून अधिक शहरांतील व गावांतील नागरिकांना डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: