Saturday, May 30, 2026
PUNE

नगरसेवक महेश लडकत यांच्या आठवणींना उजाळा

पुणे : भाजपा नगरसेवक कै. महेश लडकत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पतित पावन संघटनेच्यावतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी लडकत यांच्या पतित पावन संघटना ते भाजपा या संपूर्ण प्रवासातल्या विविध आठवणी मांडल्या. तसेच त्यांच्या लाभलेल्या कौटुंबिक सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक, राजकीय आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या.

नवी पेठेतील धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पतित पावनचे जनाभाऊ पेडनेकर, माजी खासदार प्रदीप रावत, नितिन सोनटक्के, बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, स्वप्निल नाईक यांच्यासह पतित पावनचे आजी माजी सर्व महाराष्ट्र प्रांत व पुणे शहराचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व सर्व पक्षीय नगसेवक उपस्थित होते. धनंजय लेले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन दिनेश भिलारे व प्रसाद भगत यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading