परभणी – भाजप नेते अभय चाटे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
परभणी, दि. 17 – भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे रविवारी पहाटे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मुत्यूसमयी ते 51वर्षाचे होते.
दरम्यान त्यांच्यावर सांयकाळी चार वाजता परभणीतील वैकुंठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेश नगरातील निवासस्थानी चाटे यांना मध्यरात्री एक दीड च्या सुमारास हदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांसह मित्र परिवाराने मोठी धावपळ करीत त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले.परंतू चाटे यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.त्यांच्या या निधनाने कुंटूबियांसह मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे. चाटे हे ऐरोनाँयिकल इंजिनिअर होते.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते, प्रखर हिन्दूत्ववादी, मित्रपरिवार,
पक्षवर्तूळात मनमिळाऊ, व अजातशस्त्रू असे व्यक्तीमत्व म्हणूण सुपरिचित होते. उत्तम संघटन कौशल्य असणारे चाटे भाजपाचे निष्ठावान नेते,विद्यमान राज्य कार्यकारणी सदस्य म्हणूण कार्यरत होते.
