Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

श्वेता टूरकुल परिस्थितीवर मात करून करेल का स्वतःच स्वप्न पूर्ण?

 महाराष्ट्राज बेस्ट डान्सर , सोनी मराठी वाहिनीवरला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेलं टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. कार्यक्रमात  आलेले अनेक कलाकार  आपल्या नृत्याची चुणूक दाखवत आहेत. मनात अनेक स्वप्न घेऊन आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत  त्यातलीच एक श्वेता टुरकुल हिनं बोन ब्रेकिंग या अजब स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतल  आहे. मुंबईची श्वेता  गेली ७ – ८ वर्षं ती नृत्य करते आहे. तिची हाडं अतिशय लवचीक असल्यानं ती बोन ब्रेकिंग ही स्टाईल करू शकते. या कार्यक्रमात भाग घेऊन तो जिंकणं हे तिचं स्वप्न आहे. खरं तर स्वप्नापेक्षा जास्त ती तिची गरज आहे. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर श्वेतासाठी आशेचा किरण आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातल्या श्वेताच्या कुटुंबीयांची घरं घेताना फसवणूक झाली आणि राहतं घर सोडून त्यांना भाड्याच्या घरात स्थायिक व्हावं लागलं. दरम्यान लॉकडाऊन झालं आणि घरात येत असलेल्या पैशांचा मार्गही थांबला. घरभाडं आणि घरातला खर्च यांमध्ये श्वेताला आपलं डान्सचं स्वप्न बाजूला ठेवून घरच्यांसाठी उभं राहावं लागलं. डान्स कायमचा सोडून देणं श्वेताला मान्य नाही आणि   तिला मिळालेल्या  संधीचं सोनं करुन घर पुन्हा उभं करण्यासाठी धडपडणारी श्वेता  महाराष्ट्राज बेस्ट डान्सर   टॉप ९ मध्ये आली  आहे. तिचा हा प्रवास कसा होतो आणि तिची स्वप्नं पूर्ण होतात का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डान्सचा टॉप गियर धर्मेश सर आणि मिस कलरफूल पूजा सावंत या कार्यक्रमाचं परीक्षण करताहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading