Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार – अमित देशमुख

मुंबई, दि, १५ – नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधिताना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading