पोलिसाला मारहाण करणार्यांच्या करिअरची राम कदम यांना चिंता
मुंबई – भाजपा आमदार राम कदम यांना पोलिसांना मारहाण करणार्यांचा कळवळा आला आणि मारहाण करणार्या तिघांना मुक्त करावे यासाठी त्यांनी फोनही केला.
पवई पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना तिघांनी बेदम मारहाण केली. या तिघांना पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदला आहे. त्याचे सीसीटीव्ही चित्रण आहे. असे असताना या तिघांचे करिअर बर्बाद होईल म्हणून त्यांना माफ करा असा फोन राम कदम यांनी नितीन खैरमोडे यांनाच केला आणि मारहाण करणार्यांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केला. त्यांचे संभाषण उघड झाल्याने खळबळ माजली आहे.
