Thursday, June 18, 2026
Business

‘महिंद्रा’च्या वैयक्तिक व व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किंमतींत वाढ

मुंबई, – महिंद्रा अॅंड महिंद्रा लि. (एम अॅंड एम) या कंपनीने आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किंमती 1.9 टक्क्यांनी वाढवीत असल्याची घोषणा आज येथे केली. यामुळे या कंपनीच्या विविध श्रेणींतील वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 4,500 ते 40 हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. ही वाढ आज, दि. 8 जानेवारी 2021 पासून अमलात येईल. ‘ऑल-न्यू थार’च्या बाबतीत, 1 डिसेंबर 2020 ते 7 जानेवारी 2021 या काळात नोंदणी झालेल्या गाड्यांवर ही सध्याची भाववाढ लागू होणार आहे. ‘ऑल–न्यू थार’साठी दि. 8 जानेवारी 2021पासून होणाऱ्या सर्व नव्या नोंदणींसाठी, गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळी असणारी किंमत लागू राहील. महिंद्रा अॅंड महिंद्रा ही 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी आहे.

‘एम अॅंड एम लि.’च्या ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या अनेक महिन्यांपासून वस्तूंच्या किंमती आणि इतर विविध प्रकारचे खर्च यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे आम्हालाही किंमती वाढविणे आवश्यक ठरले. आम्ही खर्च कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. किंमती वाढविण्याचा निर्णय आम्ही बराच काळ लांबणीवरही टाकला; परंतु कच्चा माल व इतर खर्चांमध्ये वाढ होत राहिल्याने, आम्हाला 8 जानेवारी 2021 पासून किंमती वाढवाव्या लागत आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading