Tuesday, June 16, 2026
PUNE

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयास स्वायतत्ता 

स्वायत्त दर्जा मिळवणारे ठरले देशातील पहिले अल्पसंख्य महाविद्यालय 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘आबेदा इनामदार सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ,कॉमर्स अँड सायन्स ‘ या  महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने  स्वायतत्ता बहाल केली आहे . असा स्वायत्त दर्जा मिळवणारे हे  देशातील पहिले अल्पसंख्य(मायनॉरिटी एज्युकेशन कायद्याखाली स्थापन झालेले ) महाविद्यालय ठरले आहे . शुक्रवारी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
  विद्यापीठ अनुदान आयोगाने  या महाविद्यालयास स्वायतत्ता दिल्यासंबंधी चे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे . विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मूल्यांकन करून स्वायत्त दर्जा दिला जातो . स्वायत्त दर्जा मिळल्याने कौशल्याधारित,कालानुरूप आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्याची मुभा महाविद्यालयास मिळाली आहे . या अभ्यासक्रमाची रचना लवकरच केली  जाणार असल्याची माहिती डॉ  पी ए इनामदार यांनी दिली . 
‘संस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण असून नव्या शैक्षणिक प्रगतीकड़े ,नव्या विद्यार्थ्यांकडे ,नव्या अभ्यासक्रमांसह जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .  कौशल्याधारित,कालानुरूप आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्याकडे आमचा कल असेल .’असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले . 

संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार म्हणाल्या ,’१९८८ पासून आम्ही कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे  मुलींच्या शिक्षणासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्नशील आहोत . शिक्षणाने घराची ,समाजाची आणि देशाची प्रगती होते ,यावर आमचा विश्वास आहे . आता या महाविद्यालयात महिलांच्या दुसऱ्या पिढीला शिक्षणाची संधी मिळत आहे . स्वायत्त दर्जामुळे अजून महाविद्यालयीन आणि पदव्यूत्तर संशोधनाच्या चांगल्या अभ्यासक्रमांचे स्वातंत्र्य आम्हाला मिळाले  आहे .याबद्दल आम्ही विद्यापीठ अनुदान आयोगाचे आभारी आहोत . ‘
आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शैला बुटवाला म्हणाल्या,’  १९९१ साली वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली . आता येथे ५५०० विध्यार्थी-विद्यार्थिनी  शिकत आहेत . महाविद्यालयास नॅक द्वारा ‘अ ‘ श्रेणी प्राप्त झाली आहे.  आमचे महाविद्यालय पुण्यात सतत पहिल्या पाच मध्ये असते . स्वायत्त दर्जामुळे नवे विषय आणि नव्या संधी विद्यार्थ्यांना देता येणार आहेत,याचा आनंद आहे ‘. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading