Sunday, May 31, 2026
PUNE

भाजप अ. जा. मोर्चा शहर कार्यकारणी जाहीर

पुणे – शहरात झोपडपट्ट्याची संख्या जास्त असल्यामुळे पुण्यातील अनुसूचित जाती मोर्च्यांच्या कार्यकारणी फार महत्त्वाची मानली जाते.त्याची घोषणा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजप अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष भीमराव साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शहर कार्यालयात करण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट प्रभारी ,गणेश घोष ,नगरसेवक आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते .
येत्या काही दिवसात पुणे शहरातील झोपडपट्टी आणि मागासवर्गीय समाजातील लोकांना पक्षात मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचे आवाहन शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.
अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे यांनी शहर कार्यकारणी जाहीर केली .निवड झालेल्या पदाधिकाऱ्याला अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटनमंत्री रवी अनासपुरे ,राजेश पांडये , नगरसेवक राजेश येनपुरे , विकास लवटे , डॉ.भरत वैरागे इतर मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन ,सत्कार करण्यात आला.
कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे सरचिटणीस ऍड. महेश सकट , शैलेश बनसोडे , रवी खैरे, उपाध्यक्ष साधूतात्या थोरात श्रीराम कांबळे, अनिल भिसे, संदीप सांगळे, सुनील गोगावले,संदीप शेंडगे ,शशिकांत जाधव , संगीता चौरे , दिनेश नेमजादे ,हिराजी गुरुडवा,किशोर वाघमारे चिटणीस बंडू चरण ,सनी साळवे ,संदीप ओव्हाळ ,उज्जवला हातागळे,अनिल पाटोळे ,निकिता गेजगे ,किरण चौधरी ,विकास भिंगारदिवे यांचा समावेष आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading