‘आयडीबीआय बॅंके’तर्फे बचत बॅंक खात्यांसाठी ‘व्हिडिओ केवायसी अकाऊंट ओपनिंग’ सुविधा
मुंबई – आयडीबीआय बॅंकेने बचत खात्यांसाठी ‘व्हिडिओ केवायसी अकाऊंट ओपनिंग’ (व्हीएओ) ही सुविधा सुरू केली आहे. ‘व्हीएओ’ ही ग्राहकांची पडताळणी करण्यासाठीची संपूर्णपणे संपर्करहीत व पेपरलेस स्वरुपाची सुविधा आहे. कोविड साथीनंतरच्या परिस्थितीत ग्राहकांकडून सादर झालेल्या मागण्यांनुसार ती तयार करण्यात आली आहे. ‘आयडीबीआय बॅंके’मध्ये बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला बॅंकेत प्रत्यक्ष न जाता किंवा कोणतेही अर्ज न भरता, आपल्या घरातून किंवा कार्यालयातून, आरामात, सोयीस्करपणे ‘व्हीएओ’च्या माध्यमातून खाते उघडता येणार आहे.
‘आयडीबीआय बॅंके’चे व्यवस्थापकीय उपसंचालक सुरेश खटनहार यांनी मुंबई येथील मध्यवर्ती ‘व्हिडिओ-केवायसी हब’मध्ये या सुविधेचे उद्घाटन केले.
‘आयडीबीआय बॅंके’चे व्यवस्थापकीय उपसंचालक सुरेश खटनहार म्हणाले, “ग्राहकांच्या हितासाठी डिजिटल सुविधा निर्माण करण्याच्या प्रवासात, ‘व्हीएओ – व्हिडिओ केवायसी अकाउंट ओपनिंग’ची सुविधा ही आणखी पुढचे पाऊल आहे. ‘आय क्विक’ मोबाईल अॅपआधारीत खाते उघडण्याशी आणि बॅंकेने नुकत्याच सादर केलेल्या ‘व्हॉट्सअप बॅंकिंग’ सुविधेशी ही ‘व्हीएओ’ सुविधा संबंधित आहे. ग्राहकाभिमुख डिजिटल सुविधा अधिकाधिक प्रमाणात सुरू करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न बॅंक करीत आहे.”
