Thursday, September 3, 2026
MAHARASHTRAPUNE

‘ग्लोबल कोकण , समृध्द कोकण ‘ चळवळीतर्फे ‘ कोकण फर्स्ट ‘ अभियानाची घोषणा

पुणे : कोकणच्या सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट ठेऊन
‘ग्लोबल कोकण , समृध्द कोकण’ चळवळीतर्फे ‘कोकण फर्स्ट’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘कुणीतरी कोकणचा विकास करेल, संकल्पना बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येऊन आपलीही देवभूमी जगात शाश्‍वत विकासासाठी ओळखली जाईल अशा स्वरूपाचे समृद्धीचे मॉडेल विकसित करू. अनेक जागतिक व्यक्तिमत्वे कोकणातले आहेत. ही व्यक्तिमत्व सुद्धा कोकणाकडे भविष्यात लक्ष देतील अशी अपेक्षा करू या. मात्र मीच आहे माझ्या कोकणचा ॲम्बेसेडर असा विचार करून नव्या वर्षात ‘ कोकण फर्स्ट ‘
Kokan first ही संकल्पना राबवण्याचा आपण संकल्प करूया, ‘ असे आवाहन संजय यादवराव यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. लंडन फर्स्ट ' London first या उपक्रमातून प्रेरणा घेऊन

ही चळवळ सुरु करीत आहोत. लंडनमधील माणूस जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी आपले लंडन किती सुंदर आहे, सुसंस्कृत आहे याची माहिती तो जगभर देतो, आणि लंडन मध्ये निमंत्रित करतो. असच यापुढे ग्लोबल कोकण ,कोकण बिझनेस फोरमचे सर्व कार्यकर्ते आपल्या विजिटिंग कार्ड वर ‘कोकण फर्स्ट ‘ kokan first हा लोगो छापतील. संपूर्ण जगभर आणि देशभर जिथे जिथे जातील तिथे कोकणचे ॲम्बेसिडर बनुन आपल्या कोकणातील निसर्गसमृद्ध पर्यटन स्थळांची, आणि येथे असलेल्या सुविधांची, येथील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती यांची माहिती जगाला देतील अशा स्वरूपाचे अभिनव अभियान नव वर्षात पहिल्या दिवसापासून सुरु करीत आहोत. समृद्ध कोकण चळवळींशी संबंधित असलेले सर्व कार्यकर्ते,आणि हितचिंतक या मिशन मध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे.
याची संपूर्ण प्रक्रिया ही पुढील काळात सर्वांना कळवली जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading