Sunday, May 31, 2026
PUNE

नमोज हॅंडस हे औजार सर्व स्वच्छता सेवकांना उपलब्ध केले जावेत – चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 3 – स्वच्छता सेवकांना काम करताना अनेक अडचणी येतात,अनेकदा रस्त्यावरील घाण साफ करताना त्यांना ती हाताने किंवा पुठ्ठा वा अन्य तत्सम गोष्टींचा वापर करुन गोळा करावी लागते.मात्र सुधीर बर्वे यांनी यावर उपाय म्हणून निर्मिती केलेल्या Namo’s hand या औजाराचा सर्व स्वच्छता सेवकांनी वापर करावा व हे औजार त्यांना उपलब्ध करुन दिले जावे यासाठी आपण प्रयत्न करु असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आपल्या आरोग्य दूतांची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि त्यासाठी हे औजार अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही ते म्हणाले.कोथरूडला आयोजित एका कार्यक्रमात क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी हे औजार चंद्रकांतदादांना भेट दिले त्यावेळी दादांनी हे मत व्यक्त केले. सुधीर बर्वे हे लंडन मधे रहात होते मात्र त्यांचे मन तेथे रमले नाही आणि मातृभूमीच्या ओढीने ते पुण्यात परतले.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या स्वच्छता अभियानाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी इ उपस्थित होते.श्री.सुधीर बर्वे म्हणाले की मी अनेक ठिकाणी स्वच्छता सेवकांना हाताने कचरा / घाण गोळा करताना बघून व्यथित झालो आणि त्यातून अश्या प्रकारची निर्मिती करण्याचे ठरवले.हे औजार वापरण्यास सुलभ असून याद्वारे स्वच्छता सेवकांचे काम सुलभ होइल व प्रत्यक्ष हाताने कचरा गोळा करण्याची गरज नसल्याने त्यांचे आरोग्य रक्षण देखील होइल.हे औजार  मनपा,जिल्हा परिषद,ग्राम पंचायत येथील सेवकांसाठी माफक किमतीत उपलब्ध केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading