Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNE

महार रेजिमेंट लष्करी संग्रहालयाचे “संग्राहक “सुधाकर खांबे यांचे निधन

पुणे – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ लेखक,  विचारवंत तसेच पुण्यातील महार रेजिमेंट लष्करी संग्रहालयाचे “संग्राहक” सुधाकर धर्माजी खांबे (वय 69) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. 

महार रेजिमेंट तसेच भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले होते. पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या आवारातील महार रेजिमेंटच्या लष्करी संग्रहालयाचे ते संग्राहक होते. महार रेजिमेंटच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त सन  2018 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. दिवंगत सुभेदार धर्माजी खांबे हे त्यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येरवडा स्मशानभूमी येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवर उपस्थित होतेे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading