भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता
नवी दिल्ली – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत कोरोना आपत्कालीन लसीकरणाचा देशातील मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात सीरमची कोव्हॅक्सिन लस बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती सीरम इन्सिट्यूटचे आदर पुनावाला यांनी ट्विट करून दिली आहे.
त्यांनी ट्विट करून माहिती देताना म्हटले आहे की, आपल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. योग्य ती सर्व खबरदारी घेऊन कोरोना लसीचा साठा केला आहे. घेतलेले श्रम सार्थक झाले असून देशातील पहिल्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीला मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल.
कोरोना लसीच्या वापराची शिफारस करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याची शिफारस केली होती. यानंतर आज अंतिम मंजुरी भारतीय औषध नियंत्रकांनी (DCGI) दिली आहे. आज डीसीजीआयने उभय लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्याचे जाहीर केले.
