बँक ऑफ बडोदा तर्फे नवीन वर्षाची जाहिरात मोहीम ‘एक फोरएव्हर रिश्ता’
मुंबई, -: ग्राहकांना व त्यांच्या सुविधांना महत्त्व, हे आपल्या ब्रॅंडचे तत्वज्ञान आहे, असे मानणाऱ्या बँक ऑफ बडोदा या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने, या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, ‘एक फोरएव्हर रिश्ता’ ही आपल्या ग्राहकांना नवीन वर्ष आशादायी व आनंददायी जावो, अशा शुभेच्छा देणारी नवीन जाहिरात मोहीम सुरू केली आहे.
‘एक फोरएव्हर रिश्ता’ हे घोषवाक्य देशभरातील प्रेक्षकांमध्र्ये रुजविण्यासाठी त्याचा पुनरुच्चार करणार्या, 10 वेगवेगळ्या भाषांमधील जाहिरातींची प्रभावी मालिका बॅंकेने सुरू केली आहे. संभाव्य ग्राहकांमध्ये ब्रँडविषयी जागरुकता निर्माण करणे व आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आपण नेहमी ग्राहकांच्याच बाजूने असतो आणि आपल्या उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीच्या सहाय्याने व सर्वोत्कृष्ट ऑफर्सच्या मदतीने ग्राहकांची स्वप्ने साकार करण्यात त्यांना आपण मदत करू इच्छितो, हे या मोहिमेतून बँकेला सांगण्याची इच्छा आहे.
या मोहिमेमागील विचार समजावून सांगताना ‘बँक ऑफ बडोदा’चे रिटेल लायबिलिटीज, वेल्थ मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस, मार्केटिंग, डीमॅट अँड एनआरआय बिझिनेस या विभागांचे मुख्य सरव्यवस्थापक पुरुषोत्तम म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या वैयक्तिक प्रवासात, त्यांचा कटिबद्ध मित्र आणि काळजीवाहू या नात्याने आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत असतो. या मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला हे नाते पुढील स्तरावर नेण्याची इच्छा आहे, जिथे ग्राहक सहजतेने कर्ज घेऊ शकतील आणि त्यांचे स्वप्ने साध्य करण्यासाठी पुढे जाऊ शकतील.”
जाहिरात मोहिमेविषयी बोलताना मार्केटिंग व ब्रँडिंगचे विभागाचे प्रमुख राकेश शर्मा म्हणाले, “जाहिरातींमध्ये कथाकथन हे अद्वितीय आणि परिणामकारक असायला हवे, यासाठी आम्ही ग्राहक-केंद्रित तत्त्वज्ञानावर आधारीत ब्रँड स्टॉपर्सच्या स्वरुपात (प्रत्येकी 15 सेकंदांच्या) जाहिराती बनविल्या आहेत. आमचे विचार सर्व प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील व रुजतील, अशी आम्हाला आशा आहे.”
