Thursday, September 3, 2026
PUNE

खाद्यसंस्कृतीची ठिकाणे ही पुण्याचे हेरिटेज – डॉ.विनीता आपटे

पुणे : अन्नब्रह्म पुरस्कार हा पूर्णब्रह्मला दिलेला पुरस्कार आहे. पूना गेस्ट हाऊस हे हेरीटेज असून पुण्याचे वैभव आहे. पूना गेस्ट हाऊसचे रंग रुप जरी बदलले तरी चव तीच आहे. पुणेकरांचे आणि पूना गेस्ट हाऊसचे नाते घट्ट आहे. पुण्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आहे. अनेक ठिकाणी खाद्यसंस्कृती वर्षानुवर्षे जपली जात आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृतीची ठिकाणे ही पुण्याचे हेरिटेज आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ.विनीता आपटे यांनी व्यक्त केले. 


निनाद पुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांच्यातर्फे अन्नब्रह्म पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले होते. पाककला क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार देण्यात आला. कै.महादेव वामन जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. 


यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, शर्मिला सरपोतदार, रामलिंग शिवणगे, शुभदा जोशी, अजित कुमठेकर, आनंद सराफ, सुनील केसरी, सुनील महाजन उपस्थित होते. पाककलेसारख्या अनेक सेवा आजही समाजामध्ये दुर्लक्षित आणि उपेक्षित आहेत. पाककला तज्ञ हे ख-या अर्थाने पडद्यामागचे सूत्रधार आहेत. परंतु त्यांना सन्मानित करण्यात येत नाही या भावनेतूनच आचारी व केटरर्स यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. सन्मानपत्र आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते. कमलाकर सावंत यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. 


किशोर सरपोतदार म्हणाले, अनंत लोकांच्या योगदानामुळे पूना गेस्ट हाऊस ही संस्था उभी आहे. सामाजिक तत्वामुळे ही संस्था लक्षात राहते. माझ्या काकांनी, आजोबांनी आणि वडिलांनी या संस्थेला सामाजिकतेची जोड दिली. उदरनिर्वाहाचे काम करीत असताना सामाजिक कार्य देखील उत्कृष्टपणे करु शकतो याचे पूना गेस्ट हाऊस हे एक उदाहरण आहे.


डॉ. न.म. जोशी म्हणाले, आपल्याला चविष्ट अन्नाने मन आणि पोट तृप्त करणाºया हातांचा सन्मान व्हायला हवा. यासाठी पुरस्कार देण्यात येतो. उदय जोशी म्हणाले, कष्ट आणि लोकसंग्रहाच्या माध्यमातून चारुकाका सरपोतदार यांनी उभ्या केलेल्या पूना गेस्ट हाऊस आणि नव्या पिढीसाठी आधुनिक रुपात सुरु केलेल्या पीजीएच एक्सप्रेस शृंखला हॉटेलच्या उभारणीकरीता ज्यांनी परंपरेचे सत्व जपून समाजकार्याचा मोठा आदर्श सर्वांपुढे ठेवला, त्या किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना सन्मानित करण्यात आले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading