Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

सुपर आजी शांताबाई पवार पोहोचल्या इंडियन आयडॉल मध्ये

इंडियन आयडॉल एक असा मंच आहे, ज्याच्यावर फक्त मोठे गायक येत नाहीत किंवा फक्त सांगीतिक घटना घडत नाहीत तर देशभरात घडणार्‍या प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी कहाण्यांनाही येथे स्थान मिळते. इंडियन आयडॉल 2020 मध्ये अलीकडेच शांताबाई पवार आल्या होत्या, ज्या पुण्याच्या रस्त्यांवर लाठी काठी परफॉर्मन्सबद्दल आणि त्यांच्या प्रेरणादायी आत्मबलाबद्दल प्रसिद्ध आहेत.सायली कांबळे आणि तिच्या गाण्याच्या चाहत्या शांताबाई पवार तिला पाठिंबा देण्यासाठी इंडियन आयडॉल 2020 च्या सेट्सवर आल्या होत्या. त्या म्हणाल्या, “ही मुलगी खूप छान गाते आणि मी तिला पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहे. मी प्रार्थना करते आणि आशीर्वाद देते की, या मुलीने यशाची शिखरे सर करावीत आणि आपल्या सांगीतिक प्रवासात लांबचा पल्ला गाठावा.”

गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या, “मी 8 वर्षांची असल्यापासून परफॉर्म करत आहे. माझ्या वडिलांनी मला कष्ट करायला शिकवले. COVID मुळे सध्या लोक घरात बसून असतात, म्हणून मी परफॉर्म करण्यापूर्वी त्यांना भांड्यांचा आवाज करून जागे करते. मी आत्ता 10 अनाथ मुलींना सांभाळत आहे आणि त्यांना पोसत आहे. त्यांना खायला घालण्यासाठी कधी कधी मला उपाशी राहावे लागते.” पुढे त्यांनी सांगितले की आता वयोमानापरत्वे त्यांना लाठी काठीचा खेळ करताना थोडा त्रास होतो.त्यांची कहाणी ऐकून प्रेरित आणि भावनिक झालेल्या नेहा कक्कडने वेळ न दवडता तत्काळ शांताबाईंना त्यांच्या कामात मदत म्हणून एक लाख रु. देऊ केले. तिला आशा आहे की शांताबाईंना त्यांच्या सत्कर्मात या पैशाचा उपयोग होईल.

हे सगळे बघून सायली म्हणाली, “अशा उदात्त काम करणार्‍या स्त्रीचे आशीर्वाद आज मला लाभले याची मला धन्यता वाटते. त्यांच्या कहाणीमुळे मला इंडियन आयडॉल 2020 च्या माझ्या वाटचालीत अधिक परिश्रम घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. नेहा मॅमची कृती हृद्य आहे आणि आज इथे आल्याबद्दल मी शांताबाईंची ऋणी आहे. हा मला माझा सन्मान वाटतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading