Tuesday, June 16, 2026
NATIONALTOP NEWS

आर्या राजेंद्रन होणार देशातील सर्वांत युवा महापौर

२१ व्या वर्षी तिरूवनंतपुरमच्या महापौर होण्याचा मान

तिरूवनंतपुरम – केरळच्या तिरूवनंतपुरम मध्ये राहणाऱ्या अवघ्‍या २१ वर्षीय आर्या राजेंद्रन या सर्वात तरूण महापौर होणार आहेत. त्‍यांनी प्रथमच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्या निवडणुकीत मतदान केले होते. विशेष म्‍हणजे या निवडणुकीत त्‍या उमेदवारही होत्‍या. या निवडणुकीत त्‍यांनी यश मिळवल्‍याने केरळ मधील सर्वात तरूण तर देशातील युवा महापौर म्‍हणून त्‍या महापौर पदावर विराजमान होणार आहेत.

आर्याचे वडील इलेक्‍ट्रिशन आहेत तर त्‍यांची आई ही गृहिणी सोबतच एलआयसी एजंट आहे. आर्या या सीपीएम पक्षाशी जोडल्‍या आहेत. नुकत्‍याच झालेल्‍या निवडणुकीत मुडावनमुगल वार्डातून त्‍या निवडून आल्‍या आहेत. त्‍यांनी २१ डिसेंबरला पदाची शपथ घेतली. सीपीएमच्या जिल्‍हा प्रमुखांनी महापौरपदासाठी आर्या राजेंद्रन यांना निवडले आहे.

प्रत्‍यक्षात, सीपीएमने २१ वर्षीय आर्या राजेंद्रन यांना महापौर पदासाठी निवडले आहे. पक्षाची जिल्‍हा समिती आणि राज्‍य समितीने त्‍यांच्या उमेदवारीला मंजूरी दिली आहे. आर्या राजेंद्रन या बीएससी गणितच्या विद्यार्थी आहेत. तसेच त्‍या पक्षाच्या छला क्षेत्र समितीच्या सदस्‍य आहेत. पक्षाच्या नेतृत्‍वाला आशा आहे की, यापुढे आणखीन शिक्षित महिला नेतृत्‍वाच्या भूमिकेतून पुढे येतील.

पक्षाने नुकत्‍याच झालेल्‍या निवडणुकीत १०० सदस्‍यीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ५१ जागा जिंकल्‍या आहेत. ३५ जागांसोबत भाजप या ठिकाणी विरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या नेतृत्‍चातील यूडीएफला १० नगरसेवकांसोबत तिसरे स्‍थान मिळाले होते. आर्या राजेंद्रन यांनी म्‍हटलय की, हा पक्षाचा निर्णय आहे. मी त्‍याचे पालन करेल. निवडणुकी दरम्‍यान लोक मला पसंत करत होते कारण मी एक विद्यार्थीनी आहे. लोकांना आपले प्रतिनिधित्‍व करणाऱा उमेदवार हा शिक्षित असायला हवा असे वाटत होते. मी यापुढेही माझे शिक्षण सुरूच ठेवणार असून, महापौर असल्‍या कारणाने मी माझी कर्तव्ये देखील पूर्ण करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading