मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे – संभाजी ब्रिगेड
पुणे, दि. 24 – मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा व ओबीसी मध्ये आरक्षण द्याव हीच संभाजी ब्रिगेड ची भुमीका आहे. असे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश ऍड. मनोज आखरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करतेय. या मराठाद्वेष्ठा सरकारच धाेरण अत्यंत निषेधार्ह आहे. सरकार मराठा समाजाला मुर्ख बनवतय. सरकार विराेधात रस्त्यावर उतरावच लागेल. आमचे संवैधानीक अधिकार असतांना हे EWS आरक्षण म्हणजे समाजाच्या ताेंडाला पान पुसण्याचे प्रकार आहे. मराठा समाजाला न्यायीक संविधानात मिळालेल आरक्षणच तारू शकते. गेल्या तिस वर्षापासून आम्ही हा लढा लढताेय. आज हा लढा अंतिम टप्प्यात असतांना हे कटकारस्थान करण्याची गरज नव्हती परंतु यामागचे सरकारचे हे कपटी धाेरण आम्ही हाणून पाडू.सकारचा मराठा समाजाचा विनाश करण्याचा हेतू आहे. ओबीसी नेत्यांच्या दडपणाला सरकार बळी पडलेले आहे, मराठा मंत्री व नेते मुग गिळून गप्प का?समाज त्यांना जाब विचारणार. ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेडचा तिव्र संघर्ष अटळ आहे.
