fbpx
Wednesday, April 24, 2024
ENTERTAINMENT

लॉकडाऊनमुळे रिंकू राजगुरु अडकली लंडनमध्ये

ब्रिटनमध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वांना याड लावणाऱ्या रिंकू राजगुरूला बसला आहे. ‘छूमंतर’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इंग्लंड दौऱ्यावर असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु ही लंडनमध्ये अडकली आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिला लंडनमध्येच थांबून राहावे लागत आहे. तिच्यासोबत ‘छूमंतर’ चित्रपटाची टीमही इंग्लंडमध्येच आहे.

समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये सुरू होते. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना आणि ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे चित्रीकरण करत आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक मोठे अभिनेते-अभिनेत्री इंग्लंडमध्ये अडकले आहेत. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय अभिनेता संतोष जुवेकरही लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading