Sunday, May 31, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

भीमा कोरेगाव हल्लेखोरांना तात्काळ अटक करा- राहुल डंबाळे

पुणे, दि. 24 – भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2017 रोजी येणाऱ्या भीम अनुयायावर काही लोकांनी हल्ला केला होता व त्यांनतर येथे दंगल घडली गेली या हल्ल्याला आणि दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारासह इतर आरोपीना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे.

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.
डंबाळे पुढे म्हणाले की मागील देवेंद्र फडणवीस सरकार हे यातील आरोपीना पाठीशी घालीत होते त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी असा आरोप करीत होते परंतु आता हे सरकार मध्ये आहेत तरीही आरोपींना अटक होत नाही म्हणजे महाविकास आघाडी सरकार ही या आरोपीनां वाचवत असल्याचा गंभीर आरोप राहुल डंबाळे यांनी या वेळी केला आहे .महाविकास आघाडी मुर्दाबाद ,भीमा कोरेगाव आरोपीना तात्काळ अटक करा अटक करा,हल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन झालेच पाहिजे आशा उस्फुर्त घोषणा कार्यकर्ते या वेळी देत होते.या आंदोलनात राहुल डंबाळे,सुवर्णा डंबाळे ,भीम आर्मीचे शहराध्यक्ष अभिजित गायकवाड ,स्नेहल कांबळे ,अजय लोंढे ,मंगल कांबळे ,भारत मिनपगारे यासह
या वेळी पुणे शहर व ग्रामीण भागातील युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्ते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading