कोरोना – राज्यात आज 3,106 नवे रुग्ण, 75 जणांचा मृत्यू
पुण्यात 234 नवीन रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रात आज, मंगळवारी दिवसभरात 3 हजार 106 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाखांच्या पुढे गेली आहे, तर मृतांची संख्या 48 हजार 876 एवढी झाली आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 19 लाख 02 हजार 458 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 4 हजार 122 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 17 लाख 94 हजार 080 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 58 हजार 376 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दररोज बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांच्या खाली आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून ते 94.3 टक्के एवढं आहे तर, मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत 1 कोटी 22 लाख 12 हजार 384 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 19 लाख 02 हजार 458 नमूने सकारात्मक आले आहेत.
महाराष्ट्रात सध्या 4 लाख 94 हजार 815 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 660 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुणे शहर ..!
- दिवसभरात 234 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 306 रुग्णांना डिस्चार्ज.
- 6 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
176462 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-5020
- एकूण मृत्यू – 4587
- एकूण डिस्चार्ज- 166855
