सँडविक एशिया तर्फे गरजू मुलींसाठी लीला पुनावाला फाउंडेशन बरोबर सामंजस्य करार
पुणे – पुण्यातील अभियांत्रिकी पदवी घेणार्या गरजू व शैक्षणिक दृष्या हुशार मुलींना पाठबळ देण्यासाठी सँडविक एशियाने लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) सह नवीन सामंजस्य करारावर (एमओयू) वर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारानुसार, सँडविक एशिया ५ वर्षांच्या कालावधीत समर्थित मुलींची संख्या १२६ पर्यंत नेईल. किरण आचार्य, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी, सॅंडविक एशिया प्रा. लिमिटेड, एलपीएफच्या अध्यक्षा लीला पुनावाला, फिरोज पुनावाला (संस्थापक विश्वस्त एलपीएफ), प्रीती खरे ( सीईओ, एलपीएफ ) आणि रिया खंदुरी, सॅंडविक एशिया प्रा. लि. यावेळी उपस्थित होते. सॅंडविकची एलपीएफशी संबंद्धता २०१५ पासुन आहे, जेव्हा कंपनीने शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना अभियांत्रिकी पदवी मिळवण्यास सक्षम करण्याच्या त्यांच्या पुढाकाराने समर्थन करण्यास सुरूवात केली. या मुलींना विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योगांच्या प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन केले गेले आहे जेणेकरून त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या सुसज्ज बनतील.
किरण आचार्य, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी, सॅंडविक एशिया प्रा. लि. यावेळी म्हणाले “शिष्यवृत्ती आणि कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत लीला पुनावाला फाउंडेशनशी संबंधित सॅंडविकला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. एलपीएफच्या या महान कार्यासाठी पुढाकार घेण्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आमच्या अविरत वचनबद्धतेतून अधिक मुलींचे शिक्षण आणि सबलीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे. ” या वेळी, लीला पुनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा लीला पुनावाला म्हणाल्या, “सॅंडविकचे आमच्याशी सहकार्य मागील पाच वर्षांपासून आहे आणि आम्ही अभिमानाने सांगतो की हा भागीदारी च्या भावनेने बांधलेला एक महत्त्वाचा संबंध आहे. आम्ही आमच्या 25 वर्षांच्या यशस्वी कार्यकालाचा उत्सव साजरा करतीवी सॅंडविक सारख्या आमच्या भागीदारांचे आभार मानतो, आम्ही मुलींना आर्थिक सहाय्यते बरोबरच एक समग्र दृष्टीकोन प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहोत, ज्यामध्ये मुलींना घडविले जाते, त्यांचा आत्मविश्वास वाढविला जातो, त्यांना रोजगाराच्या कौशल्यांबद्दल प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या करियर साठी तयार केले जाते. ”
