Sunday, May 31, 2026
PUNE

समर्थ कलाविष्कार, शिवशाही फौंडेशनच्या वतीने  रंगभूमी सेवक संघाला मदत 

पुणे – समर्थ कलाविष्कार,पुणे आणि शिवशाही फौंडेशन या संस्थांच्या वतीने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते रंगभूमी सेवक संघ या पडद्यामागील कलाकारांच्या संघटनेला अकरा हजार रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे ‘वेलकम टू गोवा चिंगम’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.या प्रयोगा दरम्यान हा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी अजय मारणे, सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले,कार्याध्यक्ष  अरुण पोमण,सहसचिव अभिजीत इनामदार,समर्थ कलाविष्कार संस्थेचे आशुतोष वैशंपायन,मधुरा वैशंपायन, लेखक-दिग्दर्शक माधव जोगळेकर, करंदीकर ,शिवशाही फौंडेशनचे बाळाराम माडकर,सुरेखा जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कोविड विषाणू साथीच्यामुळे पडलेल्या खंडा नंतर नाट्यगृहे सुरु झाल्यानंतर पार पडलेला हा नाट्य प्रयोग हाऊस फुल्ल झाल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading