भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मोटिव्हेशनल इनोव्हेशन टॉक्स’ला चांगला प्रतिसाद
‘जर्नी फ्रॉम आयडिया टू स्टार्ट अप कंपनी’
पुणे — भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इनोव्हेशन कौन्सिल तर्फे ‘मोटिव्हेशनल सेशन बाय इनोव्हेटर्स ‘या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १६ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत हा संवाद कार्यक्रम पार पडला.
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव अध्यक्ष स्थानी होते.’ गीझ्मो होम ऑटोमेशन अँड टोटल सिक्युरिटी ‘ या स्टार्ट अप कंपनीचे संस्थापक नितीन सोळंके यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि शाश्वत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या संवाद कार्यक्रमात विद्यार्थी ,प्राध्यापक सहभागी झाले.
‘सर्वांपर्यंत पोचणारे उत्पादनाची आपली संकल्पना असेल आणि सर्वाना ते परवडणारे असेल तर स्टार्ट अप कंपनी यश मिळवू शकते. ऑटोमेशन हा नव्या युगाचा मंत्र असून त्यासाठी महागड्या तंत्रज्ञाना ऐवजी ओपन सोर्स तंत्र वापरल्याने आम्हाला यश मिळाले’,असे प्रतिपादन नितीन सोळंके यांनी केले
‘आंत्रप्रूनर ,उद्योजकांचा समाजाच्या आर्थिक प्रगतीवर मोठा प्रभाव असतो . त्यासाठी नव संकल्पना वापरून उद्योजक व्हावे ‘, असे प्रतिपादन डॉ आनंद भालेराव यांनी केले. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कार्यक्रम संपला.
