कोरोना – राज्यात मंगळवारी 3 हजार 442 नव्या रुग्णांची नोंद, तर 4 हजार 395 रुग्ण बरे
पुण्यात 243 रुग्णांची वाढ
मुंबई – राज्यात आज नव्या 3 हजार 442 रुग्णांची नोंद झाली असून 4395 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज ७० जणांनी कोरोना संसर्गामुळं आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा आता ४८ हजार ३३९ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ०६ हजार ८०८ चाचण्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ०५९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
पुणे शहर ..!
- दिवसभरात 243 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 346 रुग्णांना डिस्चार्ज.
- 6 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
174452 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-4950
- एकूण मृत्यू – 4549
- एकूण डिस्चार्ज- 164953
