Sunday, May 31, 2026
NATIONALTECHNOLOGYTOP NEWS

यु ट्यूब, जीमेल या गुगलच्या सेवा पूर्ववत सुरू

मुंबई- जगभरात यूट्यूब आणि जीमेलची सेवा काही काळासाठी ठप्प झाल्याने नेटकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र सेवा ठप्प झाल्याचे नेमके कारण गुगलने स्पष्ट केलं नाही.

सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गुगलशी संबंधित सर्व सेवांवर परिणाम झाला. भारतात युट्यूब, जीमेल युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर सेवा ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला. जीमेल, युट्यूब, गुगल हँगआऊट, गुगल प्ले स्टोअर सेवा सुरु करण्यात अडचण येऊ लागली.

काही वेळानंतर या सेवा पूर्ववत झाल्यामुळे युजर्सची जीव भांड्यात पडला. मात्र सेवा ठप्प होण्याचे कारण गुगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading