Monday, June 15, 2026
PUNE

बँक ऑफ महाराष्ट्र च्या विरोधात रिपब्लिकन रोजगार आघाडीचा आक्रोश

पुणे, दि. 14 – महात्मा फुले ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,संत रोहिदास अशा सर्वच मागासवर्गीयांना स्वावलंबी बनविण्यास सुरू केलेल्या महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर होऊनही जाणीवपूर्वक प्रकरणे नाकारणाऱ्या व दुर्लक्ष करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन रोजगार
आघाडीच्या वतीने आज बँक ऑफ महाराष्ट्र च्या लोकमंगल शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून तीव्र आंदोलन करण्यात आले.


यावेळी दोषी बँक अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी घोषणा देण्यात आले .मागासवर्गीय महामंडळाप्रमाणेच मुद्रा योजनेत ही पात्र मागासवर्गीयांना कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन रोजगार आघाडीचे शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी केला .येत्या 15 दिवसात दोषी अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करून मागासवर्गीय बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावी अन्यथा राष्टीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष सुनील जाधव यांनी यावेळी दिला .या आंदोलनाचे नेतृत्त्व शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी केली .या आंदोलनात रोजगार आघाडीचे प्रदेश सचिव हरीश भाई देखणे ,संगीताताई आठवले ,विष्णुदादा भोसले ,हलीमा शेख तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading