Thursday, September 3, 2026
PUNE

गायन आणि वादनाने सजला प्रेरणा संगीत महोत्सव


पुणे : भारती विद्यापीठ स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्टस,  प्रेरणा म्युझिक आॅर्गनायझेशन आणि महाराष्ट्र कल्चर क्लबतर्फे अभंग,नाट्यगीत ठुमरीने सजलेल्या प्रेरणा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  कलाकारांनी आपली गायन आणि वादन कला यावेळी सादर केली. 
गायिका सानिया पाटणकर यांनी राग बिभास मध्ये हे नरहर नारायण हा विलंबित ख्याल आणि रे साजन व तरावा गिनत या दृत बंदिशी सादर केल्या. त्या नंतर रूप पाहता लोचनी हा  संत ज्ञानेश्वरांचा अभंग सादर केला. 
पंडित शारंगधर साठे हे पंडित मनोहर चीमोटे यांचे ज्येष्ठ शिष्य असून संवादिनी एकल वादन मध्ये त्यांनी गुर्जरी तोडी मध्ये ताल तीन ताल मासित खानी गत व मध्य लय आणि त्या नंतर झाला वाजवित अप्रतिम उंचीवर वादन नेले. पंडित अरविंद कुमार आझाद यांनी त्यांना तबल्यावर साथ संगत केली. 
त्या नंतर पंडित शौनक अभिषेकी यांनी अत्यंत वेगळा असा राग झिलाफ जो अमीर खुस्रो यांनी बांधलेला आहे, त्या मध्ये दोन बंदिशी त्यांच्या गहन गायकी मध्ये सादर केल्या आणि रागाचे गंभीर शुचिर भूत  वातावरण  निर्माण झाले. त्यानंतर डा रो  ना , डा रो ना ही भैरवी मधील सुप्रसिध्द ‘ बंदिश  की ठुमरी ‘ गात मैफलीत कळस गाठला.
त्यांना उदय कुलकर्णी यांनी हार्मोनिअमवर समर्पक साथ संगत केली. पंडित नयन घोष यांचे शिष्य सचिन पावगी यांनी सानिया पाटणकर आणि शौनक अभिषेकी यांना तबल्यावर साथसंगत केली. प्रवीण कसलीकर यांनी गायिका सानिया पाटणकर  यांना हार्मोनियमवर संगत केली. देविका बोर ठाकुर यांनी निवेदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading