Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

शाळेच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा ‘बॅक टू स्कुल’

सरकारने अनलॉकची घोषणा केली आणि मनोरंजन सृष्टीमध्ये सगळ्यांना नवा हुरूप आला. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी थांबले होते. आता अनलॉकमुळे सर्व नवीन चित्रपटाच्या घोषणा आणि पूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन हळू हळू सुरु होते आहे.
त्यातलाच एका मराठी सिनेमा म्हणजे ‘बॅक टू स्कुल’. या नवीन चित्रपटाचे नुकतेच टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ह्या चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा नावाप्रमाणे सर्व प्रेक्षकांना त्यांच्या शालेय दिवसात घेऊन जाणार हे नक्की. प्रत्येक जण त्यांच्या शालेय जीवनात अनेक अविस्मरणीय गोष्टी करत असतात. त्याच आठवणींना पुन्हा ताजे करण्यासाठी येतोय, ‘बॅक टू स्कुल’ हा नवाकोरा सिनेमा.
रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या ‘बॅक टू स्कुल’ या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रंगसंस्कार प्रोडक्शन हाऊसने यापूर्वी ‘रामप्रहर’ नावाचा सिनेमा केला असून तो २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading