राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम
पुण्यात 279 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबई, दि. 8 – राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ कायम आहे. मंगळवारी 6,365 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17,37,080वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 4,026 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 18,59,367वर गेली आहे. तर 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 47,827 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (8 डिसेंबर 2020) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 26,567 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 385 हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 4.10 टक्के केसेस ॲक्टिव्ह आहेत. 94.45 टक्के कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1.45 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट
- दिवसभरात २७९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २२० रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू. ३ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ४१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १७२५५९.
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५०७०
- एकूण मृत्यू -४५१०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १६२९७९.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४२५.
