Sunday, October 25, 2026
PUNE

अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता लाड यांचा सत्कार

पुणे – करोना च्या काळानंतर पुण्यातील नाट्यगृह सुरु व्हावीत म्हणून आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो त्याला यश आले असून त्याला पुणे महानगर पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगले सहकार्य केले असून पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , बालगंधर्वक रंगमंदिर , अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हि कलावंत व रसिकांसाठी सुसज्ज झाली असून प्रेक्षक व कलावंतांची सर्व काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे
एका लग्नाची गोष्ट ,प्रशांत दामले व कविता लाड यांच्या भूमिका असलेले नाट्यप्रयोग १२ डिसेंबर रोजी पुण्यात करण्यात येणार असून या नाटकाची तिकीट विक्री दोन्ही कलावंतांनी पहिल्या ५ प्रेक्षकांना तिकिटे देऊन तसेच रसिकप्रेक्षकांच्या वतीने नारळ फोडून आज करण्यात आली रसिकाने दाखवलेल्या प्रेमामुळे कोथरूड च्या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या निमित्ताने पुणेकर रसिक व संवाद पुणे नाट्य संस्थांच्या वतीने प्रशांत दामले व कविता लाड यांचा सत्कार करण्यात आला या वेळी संवाद चे सुनील महाजन , समीर हंपी,प्रवीण बर्वे उपस्थित होते सुनील महाजन यांनी पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading