गुरू नानक जयंतीनिमित्त वंचितच्यावतीने अभिवादन !
पिंपरी – आज संत गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणीने पिंपरी येथील गुरुद्वाराला भेट देऊन अभिवादन केले.यावेळी शहराध्यक्ष इंजि. देवेंद्रजी तायडे, मा.नगरसेवक अकुंश कानडी, गुरुनानक दरबारचे विश्वस्त सुंरिदर आदिवाल, सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड, कार्यकारणी सदस्य धनंजय कांबळे,बबन सरोदे,कमलेश वाळके,लीगल सेलचे अध्यक्ष अँड.सुनील डोंगरे, राहुल इंनकर, सचिन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहराध्यक्ष तायडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना फोन करून विश्वस्त यांच्याशी बोलणी करून दिले असता आदरणीय साहेबांनी त्यांना गुरुनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी साहेबांचे आभारही मानले. या विश्वस्तांनी सर्वांचे सत्कारही केले.
