लोकजनशक्ती पार्टीचा २०वा वर्धापनदिन पुण्यात साजरा
पुणे : रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पार्टीचा २०वा वर्धापनदिन पुण्यात २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे ७ वाजता साजरा झाला.यानिमित्त साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला .पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी स्वागत केले.रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पक्ष बांधणीची शपथ घेण्यात आली.
पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. प्रदेश सचिव अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होते. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यादवराव सोनावणे (अंकल ) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. संजय चव्हाण, के.सी. पवार, विजय गायकवाड,सविता रणदिवे, वैशाली वाघमारे, प्रमोद पासवान , अप्पासाहेब पाटील , एल डी भोसलेपश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.पक्षाला मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
