Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENT

सकारात्‍मक राहणे हा फिटनेसचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू – श्‍वेता गुलाटी

१.       तुझ्या मते फिटनेस म्‍हणजे काय?

फिटनेस म्‍हणजे शरीर व मन आरोग्‍यदायी असले पाहिजे. माझ्या मते स्वस्थ मन असलेली व्‍यक्‍ती सर्वात तंदुरूस्‍त असते. मन प्रसन्‍न व सकारात्‍मक असेल तर शरीर देखील उत्तम साथ देते. 

२.       तुझा फिटनेस मंत्र काय आहे?

पुरेसे खा, पण योग्‍य खा आणि व्‍यायाम करा. तुम्‍हाला व्‍यायाम करण्‍यास वेळ मिळत नसेल तर खाण्‍यावर नियंत्रण ठेवा.

३.       तू तुझे मन व शरीरामध्‍ये आरोग्‍यदायी संतुलन कशाप्रकारे ठेवतेस?

माझा दृढ विश्‍वास आहे की जोपर्यंत तुम्‍ही मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तोपर्यंत तुम्‍ही काहीही करा शरीर तंदुरूस्‍त बनू शकत नाही. म्‍हणून प्रथम कोणत्‍याही स्थितीमध्‍ये, तसेच व्‍यायाम करताना देखील मनावर नियंत्रण ठेवा. सर्व गोष्‍टींची सुरूवात प्रसन्‍न मनापासूनच होते. तुम्‍ही तंदुरूस्‍त राहण्‍याचा निर्धार केला तर तुम्‍ही ते करू शकता, तुम्‍ही धावण्‍याचा निर्धार केला तर धावू शकता. वजनाकडे पाहत ”मी हे वजन उचलू शकत नाही” किंवा ”मला हा व्‍यायाम आवडत नाही” असे म्‍हणण्‍यापेक्षा व्‍यायाम करा. कोणत्‍याही प्रकारची नकारात्‍मकता नेहमी घातक ठरते, म्‍हणून सकारात्‍मक राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.

४.       तुझा आव्‍हानात्‍मक व व्‍यस्‍त नित्‍यक्रम पाहता तू तंदुरूस्‍त राहण्‍यासोबत आरोग्‍यदायी जीवनशैली कशाप्रकारे राखतेस?

मी ५ महिन्‍यांपासून व्‍यायामशाळेत जात नाही आहे, मी वर्क आऊट देखील केलेले नाही. सुरूवातीला लॉकडाऊनमुळे तसे घडले, पण नंतर सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’साठीच्या व्‍यस्‍त वेळापत्रकामुळे व्‍यायामासाठी वेळ मिळाला नाही. म्‍हणून मी तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी कमी खाण्‍याचा प्रयत्‍न करते. मी कमी कॅलरीचे सेवन करते, म्‍हणजेच मला दिवसाला १४०० कॅलरींचे सेवन करायचे असेल तर मी फक्‍त ९०० ते १००० कॅलरींचे सेवन करते. ज्‍यामुळे मी त्‍या कॅलरी प्रभावीपणे बर्न करू शकत नसल्‍यामुळे माझे वजन वाढत नाही. अशाप्रकारे मी वजनावर नियंत्रण ठेवते.  

५.       तु्झ्या व्‍यस्‍त वेळेमध्‍ये तू कोणत्‍या आरोग्‍यदायी स्‍नॅकचे सेवन करतेस?

मी त्‍वरित आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स म्‍हणून नट्स, फळे आणि कधी-कधी नारळाचे पाणी सेवन करते. मी शूटिंगदरम्‍यान खूप भूक लागली असेल तर या पदार्थांचाच मनसोक्‍त आस्‍वाद घेते.

६.       एखादा पदार्थ, ज्‍याचा आस्‍वाद घेतल्‍याशिवाय तू राहू शकत नाहीस?

जंक फूडसंदर्भात मी वडा पाव, पावभाजी व स्‍टारबक्‍सचे फ्रॅप्‍पुसिनोचे सेवन केल्‍याशिवाय राहू शकत नाही. हे पदार्थ मला खूप आवडतात. तसेच मी आरोग्‍यदायी पदार्थांचे सेवन केल्‍याशिवाय देखील राहू शकत नाही. यामध्‍ये स्‍टेडफास्‍ट न्‍यूट्रिशनची प्रोटीन पावडर, दही व फळांचा समावेश आहे. मी शूटिंग करत असो वा नसो, हा माझा दररोजचा मुख्‍य लंच आहे.

७.       व्‍यायाम करत असताना तुला कोणत्‍या प्रकारचे संगीत ऐकावेसे वाटते?

व्‍यायाम करताना संगीत ऐकण्‍यासंदर्भात मी खूपच मूडी आहे. कधी-कधी मी विभिन्‍न प्रकारची गाणी ऐकते, तर कधी-कधी हिंदी गाणी ऐकते आणि कधी-कधी तर हार्ड रॉक गाणी देखील ऐकते.

८.       तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी तुला कोणती गोष्‍ट प्रोत्‍साहित करते?

आपणा सर्वांची चांगले दिसण्‍याची आणि उत्तम व सुदृढ शरीरयष्‍टी असण्‍याची इच्‍छा असते. हीच माझ्यासाठी प्रेरणादायी बाब आहे. याव्‍यतिरिक्‍त मला वाटते की, व्‍यायामामुळे माझ्या शरीरयष्‍टीमध्‍ये होत असलेले बदल पाहून प्रेरणा मिळते. मी माझ्या शरीरावर येणारे कट्स, विशेषत: अॅब्‍स, बायसेप्‍स व बॅक पाहते तेव्‍हा मला जाणवते की माझ्या शरीरामध्‍ये बदल होण्‍यास सुरूवात झाली आहे. यामधून मला तंदुरूस्‍त राहण्‍याप्रती प्रेरणा मिळते.

९.       तुझ्या चाहत्‍यांसाठी फिटनेससंदर्भात एखादा सल्‍ला?

माझ्या मते, सकारात्‍मक राहणे हा फिटनसेचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. म्‍हणून आपण सर्वांनी एकमेकांप्रती सकारात्‍मक, आनंदी आणि दयाळू राहणे आवश्‍यक आहे. माझ्या मते, निम्‍मे युद्ध येथेच जिंकले जाते आणि उर्वरित व्‍यायामशाळेत जाऊन व्‍यायाम करणे, योग्‍य आहार सेवन करणे व आरोग्‍यदायी जीवन जगणे यासह जिंकले जाते.

श्‍वेता गुलाटीला जान्‍हवीची भूमिका साकारताना पाहण्‍यासाठी पाहा ‘तेरा यार हूं मैं’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading