‘संविधानाच्या उद्देशिकेचे महत्व ‘ विषयावर वेबिनार ला चांगला प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए के के न्यू लॉ ऍकेडेमी तर्फे संविधान दिनानिमित्त ‘संविधानाच्या उद्देशिकेचे महत्व ‘ विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला . २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता हा वेबिनार पार पडला . चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (पाटणा )चे माजी कुलगुरू डॉ ए लक्ष्मीनाथ यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी बीजभाषण केले .संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .
डॉ ए लक्ष्मीनाथ म्हणाले ,’डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्यासोबतच्या अनेक अभ्यास व्यक्तींच्या योगदानाचे फलीत म्हणजे संविधानाची उद्देशिका होय.आबेदा इनामदार यांनी त्यांच्या भाषणात संविधानाचे उद्दिष्ट व संविधान बनविणा-या रचनाकारांच्या दूरदृष्टीवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत केले.
एम. सी ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आपल्या अध्यक्षिय भाषणात म्हणाले की, भारतीय संविधान हा भारतीय नैतिक मुल्यांचा गाभा असून त्याचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. प्राचार्य डॉ रशीद शेख यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसिन्टा बॅस्टिन यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. सलीम शेख यांनी मान्यवरांचे आभार मानले.
