Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

‘झी टीव्ही’ने स्थापन केली पहिली संगीत लीग- ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’!

भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात मोठे एंटरटेनर्स आणि त्यांचा परिवार  हे या लीगमधील संघांचे मालक असतील. या मालकांमध्ये सुपरस्टार गोविंदा व पत्नी सुनिता, राजकुमार राव, शक्ती आणि सिध्दांत कपूर यांच्यासह श्रध्दा कपूर तसेच जेनेलिया डिसुझा देशमुखसह रितेश देशमुख यांचा समावेश असेल. या नामवंतांना आपल्या संघांमार्फत परस्परांशी स्पर्धा करताना पाहा!

आपल्या प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘झी टीव्ही’ वाहिनीने नेहमीच काही अभूतपूर्व धक्के दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये या वाहिनीने तीन नव्या मालिका सुरू केल्या आणि नोव्हेंबरमध्ये अमानवी शक्तींवरील फॅण्टसी मालिका ‘ब्रह्मराक्षस-2’. पण यापेक्षाही अधिक मोठा सुखद धक्का लवकरच प्रेक्षकांना बसणार आहे. 2021 मध्ये संगीताचा आवाज आणि रूपरंगच बदलून टाकणारी घडामोड घडणार आहे. ‘फॅदम पिक्चर्स’च्या सहकार्याने ‘झी टीव्ही’ जगातील पहिलीवहिली संगीत लीग- इंडियन प्रो म्युझिक लीग (‘आयपीएमएल’)- प्रेक्षकांपुढे सादर करणार आहे.

क्रीडा क्षेत्रात जगाने आजवर अनेक लीग पाहिल्या आहेत, मग त्या भारतातील असोत की परदेशातील; पण संगीत क्षेत्रातील ही जगातील पहिलीवहिली लीग असून त्यात सहा संघ असतील. या संघांची मालकी शक्ती आणि सिध्दांत कपूर यांच्यासह श्रध्दा कपूर, पत्नी सुनितासह गोविंदा, राजकुमार राव आणि जेनेलिया डिसुझा देशमुखसह रितेश देशमुख यांच्यासारख्या सेलिब्रिटींकडे असेल. हे सेलिब्रिटी भारतातील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्त्व करतील आणि ते संगीताच्या क्षेत्रात या लीगद्वारे एकमेकांशी स्पर्धा करतील. या प्रत्येक संघाचे कर्णधारपद एकेका नामवंत पार्श्वगायकाकडे- त्यात एक पुरुष आणि एक महिला- असेल. याशिवाय या संघांमध्ये काही रिअॅलिटी तारेही असतील. या गायकांच्या गटांमध्ये देशाच्या विविध भागातून प्रत्येकी सहा नवे गायक समाविष्ट करून घेतले जातील. दोन विख्यात सूत्रसंचालकांकडून या लीगचे सूत्रसंचालन केले जाईल आणि 2021 वर्षाच्या प्रारंभी ही ‘इंडियन प्रो म्यझिक लीग’ अस्तित्त्वात येईल. या लीगचे कार्य क्रीडा क्षेत्रातील लीगसारखेच चालेल. त्यानुसार या कार्यक्रमात लीगस्तरावरील सामने आणि सुपर सामनाच्या रूपात पाच इनिंग्ज असतील. सुपर सामन्यात प्रेक्षकांची मते आणि अंपायर यांनी दिलेले गुण यावर निकाल ठरविला जाईल आणि त्यानुसार त्या लीगचा विजेता जाहीर केला जाईल.

या लीगच्या स्वरूपाबद्दल ‘झी टीव्ही’च्या व्यापार विभागप्रमुख अपर्णा भोसले म्हणाल्या, “प्रेक्षकांना सतत नवे, आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा ‘झी टीव्ही’चा प्रयत्न असतो. हे कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारे आणि त्यात त्यांना सहभागी करून घेणारे असतील, याचीही आम्ही काळजी घेतो. गेल्या काही वर्षांत क्रीडा रसिकांमध्ये लीग स्वरूपातील सामने लोकप्रिय बनल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत क्रिकेट या खेळाला जिथे धर्मासारखं महत्त्व दिलं जातं, त्या भारतातही प्रेक्षकांनी या खेळाच्या लीग स्वरूपाला आपलंसं करून स्वीकारलं आहे. आता इंडियन प्रो म्युझिक लीगद्वारे संगीताच्या क्षेत्रातही त्याच उत्साहाने आणि स्पर्धाशीलतेद्वारे संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रम रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलीवूडचे तारे आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटीज यांच्या मालकीचे सहा संघ या स्पर्धेत एकमेकांशी स्पर्धा करणार असल्यामुळे या स्पर्धेतील उत्कंठा आणि अपेक्षा वृध्दिंगत होणार आहे. या संघांच्या कर्णधारपदी संगीत क्षेत्रातील सर्वोच्च यशस्वी पार्श्वगायक असून त्या संघांमध्ये रिअॅलिटी कार्यक्रमांतील स्टार हे सदस्य असल्यामुळे त्यातील संगीताचा दर्जा खूपच उच्च राहील. शिवाय देशाच्या विविध भागांतील गुणी गायकांचाही शोध आम्ही घेणार असून त्यासाठी सामान्य माणसाला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झी टीव्ही आपल्या नेहमीच्या रिअॅलिटी कार्यक्रमांचं स्वरूप उपलब्ध करून देणार आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading