Tuesday, June 16, 2026
PUNE

लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा राज्यव्यापी लढा उभारू-हनुमंत साठे


पुणे येथील संगमवाडी स्थित लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारणीचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा रिपाइं मातंग आघाडीच्या वतीने राज्यभर उग्र लढा उभारण्यात येईल असा इशारा रिपाइं मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिला आहे, आज लहुजी वस्ताद साळवे यांनी जयंती होती .त्यानिमित्त संगमवाडी येथील त्यांच्या समाधीस अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
लहुजी वस्ताद यांनी स्वांतंत्र चळवळीत मोठे कार्य केले होते .महात्मा फुले ,लोकमान्य टिळक ,वासुदेव बळवंत फडके यांचे ते गुरु होते .त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठे बंड करून कित्येक स्वातंत्रवीर आपल्या तालमीत घडविले होते .त्यामुळे त्यांचे स्मारक तातडीने व्हावे अशी दलीत समाजाची खूप वर्षापासून मागणी होत आहे .परंतु स्मारकाचे काम अद्यापही सुरू नाही .त्यामुळे रीपाई मातंग आघडीच्या वतीने आज अभिवादन सभेत शासनाला इशारा देण्यात आला. .यावेळी मातंग समाजाचे नेते बाळासाहेब भांडे मातंग आघाडी बध्यक्ष संदीप गायकवाड, लखन कांबळे, खंडू शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading