गोखलेनगर, जनवाडीतील नागरिकांना दिवाळीनिमित्त जीवनोपयोगी साहित्य भेट
पुणे : म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे ) , निलेश प्रकाश निकम मित्र परिवारा तर्फे जनवाडी व गोखले नगर मधील साफसफाई कर्मचाऱ्यांना तसेच या भागातील ५ हजार कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त जीवनोपयोगी साहित्य , पणत्या, पूजा साहित्य, उटणे (दिवाळी किट ) भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका राजश्री काळे , नीलेश प्रकाश निकम, विलास निकम, प्रकाश निकम, अरुण औचरे, सुजित मनोहर हांडे, विनोद परदेशी, स्वप्निल जोशी, राजू सपकाळ, खालिद सय्यद , अशोक झडपे, एकनाथ शिंदे, अक्षय पवार, संदेश जोशी, साहिल साळुंखे, साहिल कंट्रोल इत्यादी उपस्थित होते. निलेश प्रकाश निकम यांनी स्वागत केले.
