Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENT

माझ्या रोमातूनी अल्बम प्रदर्शनाच्या वाटेवर

हळुवार प्रेमाची आठवण करून देणारे माझ्या रोमातूनी हा अल्बम लवकरच प्रदर्शित होत आहे. या ह्रदयस्पर्शी गीताचे लेखन, संगीत दिग्दर्शन आणि दिग्दर्शन या तीनही जबाबदाऱ्या पद्माकर नष्टे यांनी सांभाळल्या आहेत. पद्माकर नष्टे हे गेली अनेक वर्षे पत्रकार आणि कार्यकारी निर्माते म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. राजेश मोटे आणि पद्माकर नष्टे यांनी या गीताची निर्मिती केली आहे. प्रदिप कदम यांनी या गीताला स्वरसाज चढविला असून, प्रणव जोशी आणि स्वामिनी देशपांडे हे नवोदित कलाकार या गीताद्वारे पर्दापण करीत आहे. या गीताचे छायाचित्रण हिंदी चित्रपटसृष्टीतील कँमेरामन सुदेश देवण यांनी केले आहे तर एडिटिंग, डिआय रोहिणी लोखंडे यांनी केले आहे. निसर्गरम्य भोर,वेल्हा अशा ठिकाणी या गीताचे छायाचित्रण पार पडले. असे हे सुमधूर, रोमँटिक गीत रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते राजेश मोटे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading