fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

१३ वे यलो रिबन एनजीओ फेअर यावर्षी ऑनलाईन 

पुणे, दि. २९ –  स्वदेशीची स्वाभीमानाचे वार्षिक आणि बहुप्रतिक्षित १३ वे यलो रिबन एनजीओ फेअर (वायआरएनएफ) १ ते ८ नोव्हेंबरपर्यंत पुण्यात होत आहे. साथीच्या आजारामुळे झालेली सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता हा एनजीओ फेयर यावर्षी पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. या ऑनलाईन प्रदर्शनामध्ये स्वयंसेवी संस्था, महिला आणि बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूं पहावयास मिळतात. ह्या प्रदर्शना दरम्यान ,स्वयंम सहायता गटांना लागणारी आवश्यक बाजारपेठ उभारण्यास मदत होईल. प्रदर्शनामध्ये स्वयंसेवी संस्था आणि बचत गट त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करू शकतात. याचसोबत ते त्यांच्याकडून केलेल्या कामांबद्दल जागरुकता निर्माण करतील. 
गेल्या कित्येक वर्षांमध्ये हजारो लोकांनी विख्यात अश्या यलो रिबन एनजीओ फेअर (वाईआरएनएफ) द्वारे प्रदर्शनामध्ये उपस्थित राहुन खरेदी केली आहे. पुणे मुंबई आदी भागांमधले सर्व इच्छुक यावर्षी देखील या व्यासपिठाचा लाभ ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातुन घेऊ शकतील. यासाठी www.creaticityonline.com  या संकेतस्थळासवर लॉग ईन करून भेट देता येईल.   हे सर्वात मोठे शॉपिंग फेस्टिव्हल आहे जिथे स्वयंसेवी संस्था, बचत गट, शेतकरी उत्पादक आणि कारागीर मोठ्या संख्येने सहभागी होतील . यामध्ये भाग घेणार्या स्वयंसेवी संस्थाना शिकण्याची, आपले नेटवर्क वाढवण्याची, नविन संकल्पना आणि सध्याच्या मार्केट ट्रेंडशी स्वताला जोडण्याची अनोखी संधी वाईआरएनएफ च्या माध्यमातुन मिळेल.
यलो रिबन एनजीओ फेअरच्या १३ व्या आवृत्तीचे औपचारिक उद्घाटण १ नोव्हेंबर रोजी २०२० रोजी ऑनलाईन प्लॅटफॉर्म www.creaticityonline.com  वर होईल, रविवार १ नोव्हेंबर २०२० पासून रविवार ८ नोव्हेंबर २०२० पर्यंत हे प्रदर्शन ऑनलाईन उपलब्ध असेल.
यावर्षी सध्याच्या साथीच्या परिस्थिती मुळे बर्याचश्या स्वयंसेवी संस्था, बचत गट, कारागीर व शेती उत्पादकांना त्यांची उत्पादने विक्री करणे अवघड जात आहे, त्यामुळे त्यांचे रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणुनच त्यांच्या उत्पादनांच्या विक्री साठी तोच मंच पण ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ऑनलाईन मार्केट संबंधित पैलू हाताळण्यासाठी त्यातील बहुतेक लोक डिजिटलपणे सज्ज नाहीत, त्यांना अश्या स्वरुपाची विक्री करण्याचा अनुभव नाही म्हणुनच या काळात ईशान्य फाउंडेशन त्यांच्या मदतीसाठी सज्ज आहे. ईशान्य फाउंडेशन ने त्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असुन बरोबरच मदत देखील केली आहे. ज्यात ऑनलाईन प्रक्रिये मध्ये त्यांना संपूर्ण मदत केली जाईल आणि ती ही विनामुल्य.
या ऑनलाईन प्रदर्शनामध्ये स्वयंसेवी संस्था, बचत गट, शेतकरी उत्पादक आणि कारागीर मोठ्या संख्येने सहभागी होतील. जे की जीवन निर्वाह, आरोग्य, महिला सशक्तीकरण, मुलांचे शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या विविध कार्यांमध्ये नि: स्वार्थपणे काम करतात.यात ग्राहक घरबसल्या केवळ ऑनलाईन लॉग इन करुन आरामत आणि सुरक्षित शॉपिंगचा आनंद घेऊ शकतात.
या वर्षाच्या ऑनलाइन प्रदर्शनातील काही महत्वाचे मुद्दे-– आठ दिवसीय ऑनलाइन मेळाव्यात पुणे, मुंबई, सांगली, हिमाचल प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड आणि गुजरात मधुन सहभाग पहावयास मिळेल.

– प्रदर्शनावर प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा पर्यावरणास अनुकूल उत्पादनांची विस्तृत श्रेणी दिली जाते जेणेकरून पर्यावरणास चालना मिळेल.-महत्वाची शेतीची उत्पादने, आरोग्य आणि निरोगी जीवनासाठीची उत्पादने येथे असतील बरोबरच कलात्मक हस्त कलेची उणीव येथे भासणार नाही.
-सगोमया (निसर्गीक उत्पादने, गाईच्या शेणापासून बनलेली उत्पादने) हा ईशान्य फाउंडेशनने घेतलेला एक अनोखा पर्यावरण अनुकूल उपक्रम आहे. हे दुर्दैव आहे की बरेच शेतकरी संकटात सापडले आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहे आणि अशातच ईशान्य फाउंडेशनने या सगोमया द्वारे त्यांना उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्त्रोत तयार करुन शेतकरी वर्गाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
-काश्मिरी नैसर्गिक मध, फोगट बी कडे मल्टि फ्लोरल, तुळशी, कडुनिंब अजवाइन, हरियाणामधील पियरी फ्लेवर मध . महिला उमंग प्रोडक्ट मध्ये उत्तराखंडमधील विविध प्रकारचे लोणचे, मध, स्ट्रॉबेरी आणि प्लम्सचे जॅम आहेत. या बरोबरच जर्दाळू, आंबा आणि मनुका चटणी पहावयास मिळेल.
-हिमाचल प्रदेशातील मां कामाख्या बचत गटाकडे अक्रोड, बदाम, अंजीर, माणुका, हळदी, ड्राई मनुका आणि आंबा पावडर यासारख्या उत्पादनांची विक्री करणार आहे.-राम रहीम बचत गटाकडे सांगली, सेलम, राजापुरी यासारखे हळदीचे प्रकार आहेत आपणा सर्वांना ठाऊक आहेत की रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक काय शोधत आहेत.- गुजरात सौराष्ट्रमधील तांगलिया किंवा दाना हे 700 वर्ष जुन्या हस्तकलेचे सादरीकरण करीत आहे.
-आणखी अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या विविध प्रकारचे दिवे, कंदील, गिफ्टिंग वस्तू, जूट पिशव्या, केळीच्या झाडापासुन बननार्या पर्स व विविध उत्पादने आदी सारख्या कल्पनांचे प्रदर्शन करतील.
वायआरएनएफच्या या वर्षाच्या आवृत्ती बद्दल बोलताना, ईशान्य फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी पारुल मेहता म्हणाल्या की, “ गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या या महोत्सवाच्या अखंड परंपरेमध्ये आम्हास खंड पडू द्यायचा नाही म्हणूनच या विपुल प्रतिभेचा व्यासपीठ म्हणून वायआरएनएफ चे ऑनलाईन स्वरुप आम्ही घेऊन आलो आहोत.मी आमच्या सर्व समर्थकांना नंम्रपणे भेट देण्यासाठी आमंत्रित करत आहे. आपल्या द्वारे केली जाणारी खरेदी ही आपल्याला चांगल्या खरेदारीचा अनुभव तर देतीलच आणि बरोबरच या आव्हानात्मक काळात बर्‍याच कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू देखील खुलेल.
प्रदर्शनाला लाभ घेण्यासाठी 1 नोव्हेंबर पासून  www.creaticityonline.com   वर् लॉग इन् करा.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading