fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

परभणीचे खासदार संजय जाधव यांना मारण्यासाठी २ कोटींची सुपारी

परभणी : शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शिवसेना खासदार संजय जाधव यांनी स्वतः ही तक्रार दाखल केली आहे.

संजय जाधव यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने कट रचला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा’ असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान खासदारांच्या जीवावर उठलेला हा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading